माणसाचा स्वभाव कधी बदलेल याचा नेम नसतो ... काही जन पेहेरावापारात्वे स्वभाव बदलतात ...बोलायची सोय उरली नाही...कालपर्यंत चौकशी करणारी मानस आज आम्हाला काही देन घेण नाही असाही बोलायला कमी पडत नाहीत, का तर म्हणे आमचा अपमान झाला , हल्ली माणसांना मोठेपणा हवा असतो, तो कशाचाही असला तरी चालेल पण मोठेपणा हवा!,कोणाला काही चांगल बोललो तरी लोक " आज यांनी अस का विचारलं ?" याबद्दल विचार करण्यात आपला वेळ वाया घालवतात, शेजार्यांच्या घरी काही चांगल झाल कि यांच्या पोटात दुखायला सुरुवात होते,अशा "विचित्र " माणसांची फौज कायमच आपल्या अवतीभवती असते,अशा विचित्र माणसांची चित्रे कायमच बदलत राहतात , एखाद्याने खरच खूप चांगल काम केल असेल तर हि मंडळी त्यामध्येहि आपला research करतात आणि analysis करण्यासाठी त्या व्यक्ती पुढेही हजर राहतात!....अशी मंडळी स्वतःतर काही करतच नाहीत पण दुसर्यांबद्दल "तो / ती भविष्यात काही करूच शकणार नाहीत" असा शेरा मारून मोकळी होतात ... न यांना कोणी विचारलेल असत न कोणी यांच्यापाशी आलेल असत, हि मानस स्वतःला सामाजिक बोर्ड ऑफ दिरेक्टर्स समजत असतात, अनावश्यक गोष्टींची उगाचच सामाजिक बातमी करायची यांची सवयच असते ...एखाद्याला टोचून बोलण्याची कोणतीही संधी हि लोक सोडत नाहीत ,"आम्हाला तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या"असा review देऊन मोकळी होतात ..., "तुमच्या अपेक्षा विचारायला अल होत कोण ?".. हा हा हा ... शेरा मारण हा यांचा हातखंडाच असतो ... , सगळे आपापल्या आयुष्यात आनंदी असले तरीही हि लोक त्यांना विचारणार "अरे ती तुझी आजी आजारी होती आता कशी आहे ?", आजीला स्वर्गवासी होऊन वर्ष लोटलेल असत मग दुखी व्यायच नसतानाही आपण "पुढच्या महिन्यात वर्षाश्राढ आहे !" अस बोलून मोकळे होतो , मनापासून विचारपूस करणारी मानस नाही राहिली आता, मदतीचा हात देणारी स्वार्थी बनली आहेत , मुलांच्या एखाद्या मित्र / मैत्रिणीला परीक्षेसाठी स्वतःच्या घरी राहायला जागा दिली , त्याचेही भाडे वसूल करणारी माणसे पहिली,एका हाताने देणारी आणि दुसर्या हाताने व्याजासहित वसूल करणारी पहिली, आपण माणुसकीचे शिकलेले धडे पुस्तकापार्यांतच मर्यादित राहिले....competition च्या या दुनियेत आपण हा शब्दच विसरले सगळे! ...मी , माझा करण्यातच माणुसकी मातीमोल झाली, आणि संस्कार विरून गेले ....
तसं पाहायला गेल तर परिस्थितीही माणसांना बदलत असेल , पण आपल्यात बदल घडवन हे स्व्तःपार्यांतच मर्यादित असायला हव आहे,प्रतिकूल परिस्थिती सर्वांवरच येत असते , म्हणून दुसर्याची उणी दुनि काढायला काही परिस्थिती शिकवत नाहीच न! कोणीही जन्मतः तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येताच नाही, त्यासाठी कष्ट , सहनशीलता लागते , शून्यातून जग पाहण्याची दृष्टी लागते, इतरांनी काहीही बोलले तरीही आपल्या कामाशी प्रामाणिक राहण्यातच शहाणपण असत अस मला तरी वाटत. नाहीतर हल्ली एखाद्या मोठ्या कंपनी मेनेजर ला हि शिपाई बोलण्याचा प्रघात आहेच,असो जे अशी कुसपत काढत असतील त्यांनाच माहित,मी म्हणते सगळ्यांनीच सचिन तेंडूलकर झाले तर सचिनला value नाही राहणार , त्याच महत्व कस कळणार ?
हल्ली जर सर्वांनी मोठेपणाच्या गोष्टी जरा कमी केल्या तर बर होईल , जीवन आनंदी होईल, लोक डोळस असतातच त्यांना मोठेपणा सांगायची गरज असते अस मला तरी नाही वाटत.
नुकताच रिलीज झालेला डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंचा चित्रपट पहिला, आणि वाटल आपल्यासारख्या साधारण माणसाला अशी मोलाची काम नाही जमणार , आपण फक्त शेजारांच्या प्रगतीवर जाळणारे , माणूस म्हणून जगन अजूनतरी शिकायचं आहे.खरच आहे , माणसाच्या गरजा तिलाएवधया असतात आपण , अपेक्ष्यांचे थर रचून त्या पर्वताएवध्या बनवतो .